Project Description
आत्म-संशोधनाचा प्रवास (मराठी)
Join Bhakti Courses for Online Education
Become Part of Bhakti Courses to Deepen Your Spiritual Learning.
पाठ्यक्रम श्रेणी: स्तर ०१
पाठ्यक्रमाची पद्धत: ऑनलाइन
वीडियो: ७ वीडियो
पाठ्यक्रम कालावधि: जास्तीत जास्त ६ महीने।
शुल्क: निःशुल्क
शुल्क: निःशुल्क
या ऑन-डिमांड कोर्समध्ये भगवद्गीतेतील श्लोकांचा आणि मुख्य धर्मशास्त्रीय कल्पनांचा अभ्यास सारांशरुपाने समाविष्ट आहे. भगवद्-गीता हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आध्यात्मिक ग्रंथ आहे, जो ५००० वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णाने सांगितला होता.
या कोर्समध्ये, आम्ही भगवद्गीतेचा विचार केला आहे आणि या प्रसिद्ध शास्त्राचे संपूर्ण महत्त्व ओळखण्याचा प्रयत्न करून, त्यातील मुख्य सूत्र स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.
खालील ‘आता नावनोंदणी करा‘ बटणावर क्लिक करून, तुम्हाला कोर्समध्ये निःशुल्क नावनोंदणी करण्यासाठी नेले जाईल.
हा अभ्यासक्रम वेदांताच्या विद्यार्थ्यांसाठी, आध्यात्मिक साधकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण आणि परिपूर्ण जीवन जगू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी तयार करण्यात आला आहे. हा ऑन-डिमांड ऑनलाइन कोर्स घर आणि कामाच्या जीवनात कोणताही व्यत्यय न आणता तुमच्या स्वतःच्या सोयीनुसार अभ्यास करण्याची संधी प्रदान करतो. एकावेळी एक व्हिडिओचे अध्ययन तुम्ही तुमच्या स्वत:च्या गतीने प्रगती करु शकता, जेणेकरून ते तुमच्या वेळापत्रकानुसार अनुकूल असेल.
हा अभ्यासक्रम सात सत्रांमध्ये विभागलेला आहे
१. आनंदाचा शोध
२. देव अस्तित्वात आहे का?
३. देव कोण आहे?
४. मी कोण आहे?
५. चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडते?
६. सर्वोच्च योग प्रणाली
७. भगवद्गीतेचा व्यावहारिक उपयोग
Become Part of Bhakti Courses to Deepen Your Spiritual Learning.